Wed, Apr 24, 2019 16:13होमपेज › Sangli › महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:26AM

बुकमार्क करा
 कुपवाड : वार्ताहर

 शहरातील श्रीमती इंदूबाई शिवाजी माने (वय 52, रा. उल्हासनगर) या महिलेच्या खूनप्रकरणी संशयित  संतोष लहू गवस (वय 19, सध्या रा. कुपवाड, मूळ गाव फणसवाडी ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ) आणि त्याचा साथीदार उमेश आप्पाण्णा कुल्लोळी (वय 19, रा. नागराज कॉलनी, सांगली) या दोघांना पोलिसांनी आज अटक केली. तिच्या मुलीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधात ती अडथळा ठरत असल्याने तिला कायमचेच संपविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

 कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गुरूवारी (दि.11) सकाळी कुपवाड - माधवनगर रस्त्यालगत असलेल्या शिवाजी कोष्टी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये पोत्यात बांधलेला व सडलेल्या अवस्थेतील या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. 

कुपवाड पोलिसांनी गतीने तपास यंत्रणा राबवून गुरूवारी दिवसभर मृत महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी संशयित  संतोष गवस यानेच हा प्रकार साथीदाराच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झालेे. कुपवाड पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, विश्वास वाघ यांनी संशयितांचा शोध सुरू केला.

मंगळवारी सकाळी संशयितांनी त्यांच्या सांगलीतील मित्रांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. पोलिसांनी तातडीने त्या मित्रांना ताब्यात घेऊन संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासले. संशयित  आरोपी  उमरमोडी (सज्जनगड) धरणाजवळ असल्याचे समजले. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन संशयितांना तातडीने ताब्यात घेऊन चौकशी केली.

महिलेच्या मुलीबरोबर संतोष गवस याचे अनैतिक संबंध होते. मात्र त्यात या महिलेचा नेहमी अडथळा येतो असे  गवस  याला वाटत होते. त्याने   त्याचा मित्र उमेश कुल्लोळी याच्या मदतीने शनिवारी (दि. 6 जानेवारी) सायंकाळी  महिलेला  भाड्याच्या खोलीत बोलावून घेतले. तिथे   पट्ट्याने तिचा गळा आवळला. या झटापटीत डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.