Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Sangli › सांगलीत दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सांगलीत दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

करोली (एम) येथील मनोहर राघू घोडके आणि त्यांच्या पत्नी शालन यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेतले. पोलिसांनी दोघांनाही तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 

गावातील काहींनी ताब्यात घेतलेली जमीन परत मिळावी आणि  त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे; मात्र त्याची दखल न घेतल्याने त्यांनी आज पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

त्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माझी गावात मालकीची महार वतनाची जमीन आहे. या जमिनीचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीसुद्धा सात-बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यात आले. गावातील काहींनी नंदकुमार घोडके यांना हाताशी धरून या जमिनीच्या खरेदीचा बोगस दस्त केला. 

या जमिनीत पेरणी केलेली असतानाही   मारहाण व शिवीगाळ करून जबरदस्तीने पीक काढून नेले. आमचे घर पाडले. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंदर्भात अनेक वेळा तक्रार अर्ज सादर केले; मात्र त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मला न्याय द्यावा; अन्यथा मुंबईत मंत्रालयासमोर  सर्व कुटुंबीय आत्मदहन करतील.दरम्यान, त्यांच्या या निवेदनाची दखल न घेतल्याने या दाम्पत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते. 

Tags : trying, suicide, dalit couple, karoshi m,  sangli land issue pudhari news,


  •