Thu, Jun 27, 2019 09:57होमपेज › Sangli › सांगलीत ट्रकने महिलेला चिरडले

सांगलीत ट्रकने महिलेला चिरडले

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 19 2018 8:46PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मस्जिदजवळ भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. यामध्ये 45 वर्षाची अनोळखी महिला जागीच ठार झाली. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर तुफान दगडफेक करीत ट्रकची तोडफोड केली. याबाबत रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
एक अनोळखी महिला गेल्या काही दिवसांपासून पाकिजा मस्जिद परिसरात  फिरत  होती.  

सोमवारी रात्री मस्जिदसमोरील शंभर फुटी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने (टीएन 28 एआर 4566) या  महिलेला  जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये  ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने  तिचा जागीच मृत्यू झाला. 

घटनास्थळी सांगली शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला हटवून मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात अज्ञात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.