Thu, May 28, 2020 23:58होमपेज › Sangli › ट्रक-बसची धडक; १६ जखमी

ट्रक-बसची धडक; १६ जखमी

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:29PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगलीवाडी येथील बायपास रस्त्यावरील कदमवाडी फाटा येथे एसटी बसने ट्रकला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले. रविवारी सकाळी ही घटना घडली. यामध्ये चालक, वाहकही जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चालक संपत वसंत रोडेकर  (वय 43, रा. येलूर), वाहक रामचंद्र ज्ञानू गुरव (वय 43, रा. करंजवडे), शुभांगी भारत हसबे (वय 21, रा. कुपवाड), पांडुरंग शंकर माळी (वय 75, रा. कवलापूर), शीतल सचिन कोळी (वय 30, रा. आष्टा), संगीता शरद कांबळे (वय 40, रा. जयसिंगपूर), शरद सुदाम कांबळे (वय 43, रा. जयसिंगपूर), संगीता पिराप्पा तलवार (वय 36, रा. सांगली), गजेंद्र कनाप्पा पुजारी (वय 57, रा. कागवाड), अमिना इलाही शिकलगार (वय 60, रा. सांगली), प्रियांका पंडित खोत (वय 21, रा. सांगली), सिद्धार्थ राजाराम लोंढे (वय 42, रा. गावभाग, सांगली), जयश्री सिद्धार्थ लोंढे (वय 36, रा. गावभाग, सांगली), रचना नानासाहेब जाधव (वय 21, रा. सांगली), महेश बाबुराव गावडे (वय 42, रा. मिरज), भारत गणपती शिंदे (वय 65, रा. दुधगाव) अशी यामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

शिराळा डेपोची सांगली-इस्लामपूर बस (एमएच 20 बीएल 1365) सांगली  बसस्थानकावरून पावणेनऊच्या सुमारास सुटली. बायपास रस्त्यावरून जात असताना सांगलीवाडी येथील कदमवाडी फाट्यावर इस्लामपूरहून सांगलीकडे येणार्‍या ट्रकशी (एमएच 10 झेड 4696) तिची समोरून धडक झाली. बसने चालकाच्या बाजूने ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. तर वाहक उभे राहून तिकीट देत असल्याने तोही जखमी झाला. तर यामध्ये 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.