Wed, Jul 17, 2019 12:20होमपेज › Sangli › सांगलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सांगलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

ट्रकने  दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत यासीन गौस सनदी (वय 55, रा. माळी झोपडपट्टी, दक्षिण शिवाजीनगर) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, या अपघाताची नोंद येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : यासीन यांनी चांदणी चौकातील एका बँकेतून त्यांनी पैसे काढले. त्यानंतर ते त्यांच्या दुचाकी (एमएच 10,डी4895) वरून गावात  निघाले होते. त्याच वेळी  शासकीय गोदामातील धान्य वाहतूक करणारा ट्रक (एमएच09 एल 4420)  सांगलीकडे येत होता. त्याने दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामुळे यासीन  पुढील चाकाखाली सापडले. त्यांना तातडीने येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  पोलिसांनी अपघातातील ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

यासीन यांच्या दुचाकीला धडक बसल्यानंतर ट्रक सोडून चालकाने  पलायन केले. त्यानंतर काही वेळात यासीन यांचे नातेवाईक आणि परिसरातील लोक अपघाताच्या ठिकाणी आले. त्यांनी संतप्त होत ट्रकवर दगडफेकही केली.