Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Sangli › सांगलीत क्रांतिसिंहांना आदरांजली

सांगलीत क्रांतिसिंहांना आदरांजली

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 10:17PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात महापौरांकडे तसेच प्रशासनाकडे सतत मागणी केली जात आहे. परंतु महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, शहाजी पवार, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, विजयसिंह महाडिक, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, डॉ. नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, डॉ. संजय पाटील, योगेश पाटील, डॉ. प्रमोद लाड, विजय कोगनोळे, पंडितराव पाटील, श्रीरंग पाटील, प्रा. नंदकुमार सुर्वे, तुकाराम घोरपडे, अजित पाटील, हमाल पंचायतीचे बापूसाहेब मगदूम, शाहीन शेख, डॉ. विजयकुमार शहा, 

जे. के. महाडिक, सुहास पवार, तेजस्विनी सूर्यवंशी, उत्तम कांबळे, महादेव पाटील, जगदीश पाटील, पैगंबर शेख, अजित ढोले, रमेश सहस्त्रबुद्धे, कॉ. उमेश देशमुख, अ‍ॅड. अमित शिंदे, मारुती शिरतोडे, दिलीप सव्वाशे आदींसह मान्यवर उपस्थित होते.