Thu, Feb 21, 2019 13:06होमपेज › Sangli › डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 10:15PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विविध मान्यवरांकडून त्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर हारुण शिकलगार, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, काँग्रेसचे शहर जिल्हध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रकाश बिरजे, शेखर इनामदार, प्रियांदन कांबळे, युवराज बावडेकर, गणपतराव साळुंखे, बिरेंद्र थोरात, प्रमोद कुदळे, आदींनी अभिवादन केले. 

सुरेश दुधगावकर, डॉ. प्रमोद दीप, नितीन गोंधळे, शुभम तिरमारे, किरणराज कांबळे, शेखर इनामदार, युवराज बावडेकर, नितीन कांबळे, सचिन सव्वाखंडे तसेच संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी अभिवादन केले.