होमपेज › Sangli › ट्रॅक्टरच्या धडकेत बेरडमाचीचा एक ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत बेरडमाचीचा एक ठार

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:01AMइस्लामपूर : वार्ताहर

रस्त्यावरून  चालत निघालेल्या सुरेश तुकाराम चव्हाण (वय 40, रा. बेरडमाची, ता. वाळवा) यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात किल्लेमच्छिंद्र फाटा येथे शुक्रवारी रात्री झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर सोडून पलायन केले. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तुकाराम चव्हाण  कृष्णा कारखान्याकडून बेरडमाचीकडे  चालत निघाले होते. 

पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.23/टी-4655)ने त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे ते  रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निवास  रामचंद्र मंडले (रा. बेरडमाची) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.