Wed, Apr 24, 2019 16:26होमपेज › Sangli › राऊतवाडी धबधब्याचा कस्तुरी सभासद महिलांनी लुटला आनंद

राऊतवाडी धबधब्याचा कस्तुरी सभासद महिलांनी लुटला आनंद

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 7:30PMइस्लामपूर : प्रतिनिधी

ऊन-पावसाचा खेळ आणि 200  फूट उंचीवरून पडणारे धबधब्याचे पाणी  आणि त्यातून उडणारे तुषार याचा आनंद इस्लामपूर शहर परिसरातील कस्तुरी क्‍लबच्या महिलांनी राऊतवाडी येथे धबधब्यात निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द असा राधानगरी तालुक्यातील ‘राऊतवाडी’  धबधबा या ठिकाणी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते.  या वर्षा सहलीचा महिलांनी पावसात तसेच धबधब्याच्या पाण्याखाली भिजून मनमुराद आनंद लुटला. अधूनमधून ऊन-पाऊस आणि हिरवेगार डोंगर हे सर्व दृश्य सर्वांना साद घालत 
होते. सहभागी कस्तुरी महिला सभासदांना प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा- बिस्कीटे देण्यात आली. प्रकाश पब्लिक स्कूलचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांनी आपल्या स्कूलची बस मोफत दिल्याने कस्तुरी सभासदांना आनंद लुटता आला.

यावेळी महिलांनी गाणी म्हणत डान्स केले.  फनी  गेम्स घेऊन मनमुराद  आनंद लुटला. या फनी गेम्समध्ये सुषमा यादव, मुमताज मुल्‍ला, अलका शहा, आसिफा  बागवान, नीलम पाटील  यांनी विजय मिळविला. महिला सभासदांनी दिवसभर आनंद लुटला आणि दै. पुढारीच्या कस्तुरी क्‍लबच्या  या उपक्रमाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे यापुढे एक दिवस मुक्कामी सहल काढण्यात यावी, अशीही मागणी महिला वर्गांने केली. दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या को-ऑर्डीनेटर मंगल देसावळे यांनी संयोजन केले.