Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Sangli › मिरजेत काही प्रभागात‘काँटे की टक्कर’

मिरजेत काही प्रभागात‘काँटे की टक्कर’

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 8:07PMमिरज : जालिंदर हुलवान

निवडणूक रणधुमाळीत मिरजेत काही प्रभागांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. प्रचाराला गती आली आहे. उमेदवारांनी गाठीभेटीच्या फेर्‍या सुरू केल्या आहेत. 3, 4, 5, 6, 7 व 20 या प्रभागांमधून 23 जागांसाठी 137 उमेदवार नशीब अजमावणार आहेत. प्रभाग 3 मध्ये अ गटात भाजपच्या अनिता वनखंडे, काँग्रेसच्या प्रतीक्षा सोनवणे अशी लढत होणार आहे. येथे 13 उमेदवार आहेत. प्रभागात ब गटात काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित दोरकर, भाजपचे नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्यात लढत होणार आहे. येथे सहा उमेदवार आहेत. क गटात भाजपच्या नगरसेविका शांता जाधव, राष्ट्रवादीच्या यास्मीन चौधरी यांच्यात लढत होणार आहे. येथे सहा उमेदवार आहेत. ड गटात भाजपचे संदीप आवटी, शिवसेनेचे सूरज पाटील, काँग्रेसचे सचिन जाधव यांच्यात लढत होणार आहे.   

प्रभाग 4 मध्ये अ गटात भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, अपक्ष बंडू शेटे, जनता दलाचे फैयाज झारी अशी लढत होणार आहे. येथे चारच उमेदवार आहेत. ब गटात भाजपच्या अस्मिता सलगर, अपक्ष नंदा कोळेकर, कल्पना फोंडे यांच्यात लढत होणार आहे. येथे सहा उमेदवार आहेत. क गटात भाजपच्या मोहना ठाणेदार, अपक्ष विद्या नलवडे, शिवसेनेच्या मुग्धा गाडगीळ यांच्यात लढत होणार आहे. येथे चार उमेदवार आहेत. या प्रभागातील ड गटात अत्यंत चुरस होणार आहे. भाजपचे नगरसेवक निरंजन आवटी, अपक्ष माजी नगरसेवक अनिल कुलकर्णी यांच्यात लढत होणार आहे. येथे सात उमेदवार आहेत. 

मिरजेतील सर्व प्रभागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी प्रभाग 5 मध्ये या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. प्रभाग 5 मध्ये अ गटात भाजपचे संभाजी मेंढे, काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे, एमआयएमचे सईद सौदागर, सुधार समितीचे तानाजी रूईकर अशी लढत होणार आहे. ब गटात भाजपच्या आफरीन रोहिले, काँग्रेसच्या नगरसेविका बबिता मेंढे, अपक्ष समेधा देशपांडे, शिवसेनेच्या रूक्मिणी अंबिगेर अशी लढत होणार आहे. क गटात भाजपच्या मीनाक्षी चौगुले, राष्ट्रवादीच्या नगरसेविका मालन हुलवान, काँग्रेसच्या नजनीन पिरजादे, एमआयएमच्या शिरीनबानू पिरजादे अशी लढत होणार आहे. ड गटात काँग्रेसचे करण जामदार व राष्ट्रवादीचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यात  लढत होणार आहे. येथे आठ उमेदवार आहेत.

प्रभाग 6 मध्ये अ गटात राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, भाजपचे खुदबुद्दीन काझी, एमआयएमचे शाहीद पिरजादे यांच्यात लढत होणार आहे. ब गटात एमआयएमच्या नसीम कुपवाडे, भाजपच्या परवीन कुरणे, शिवसेनेच्या परवीन लष्करी, राष्ट्रवादीच्या नर्गिस सय्यद यांच्यात लढत होणार आहे. क गटात भाजपच्या मुनेरा शरीकमसलत व राष्ट्रवादीच्या रझीया काझी यांच्यात लढत होणार आहे. ड गटात राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी, काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक अल्लाद्दीन काझी, अपक्ष शरद सातपुते यांच्यात लढत होणार आहे. 

प्रभाग 7 मध्ये अ गटात माजी नगरसेवक आनंदा देवमाने, काँग्रेसचे नगरसेवक बसवेश्‍वर सातपुते, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धनराज सातपुते यांच्यात लढत होणार आहे. ब गटात काँग्रेसच्या नगरसेविका धोंडुबाई कलगुटगी, भाजपच्या नगरसेविका संगीता खोत यांच्यात लढत होणार आहे. क गटात भाजपच्या गायत्री कुल्लोळी, काँग्रेसच्या जयश्री म्हारगुडे, जनता दलाच्या मीनाक्षी हुलवान यांच्यात लढत होणार आहे. ड गटात माजी महापौर किशोर जामदार, भाजपचे गणेश माळी, शिवसेनेचे महादेव हुलवान यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग 20 मध्ये अ गटात भाजपचे विवेक कांबळे व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यात काट्याची लढत होणार आहे. ब गटात भाजपच्या रेखा सूर्यवंशी, राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांच्यात लढत होणार आहे. क गटात भाजपच्या जयश्री कुरणे, राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांच्यात लढत होत आहे.