Fri, Apr 26, 2019 10:14होमपेज › Sangli › सांगली, मिरजेत बसेसवर दगडफेक

सांगली, मिरजेत बसेसवर दगडफेक

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 03 2018 1:17AM

बुकमार्क करा
सांगली/मिरज : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे मंगळवारी सांगली, मिरज शहरात तीव्र पडसाद उमटले. मिरजेत पाच एस.टी. बस तर सांगलीत एका खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञातांनी दगडफेक केली. दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी सांगलीत, तर आरपीआयने इस्लामपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पाळावा, असेही आवाहन सांगलीत झालेल्या बैठकीत करण्यात आले.

मिरज-संतोषवाडी मार्गावरील बसवर सोमवारी रात्री 9 वाजता दगडफेक करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या काचा फोडण्यात आल्या. मिरज शहर बसस्थानकात उभ्या असलेल्या चार शहरी बसवर  जमावाने रात्री दगडफेक करून काचा फोडल्या. दरम्यान दुपारी  एका शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना निवेदन दिले. त्यामध्ये घटनेला जबाबदार असणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. दुपारी अडीचच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलजवळ एका ट्रॅव्हल्स बसवर अज्ञातांनी दगडफेक करून तिच्या काचा फोडल्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बस तेथून हलविली. 

बुधवारी घटनांचा निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना  देण्यात येणार आहे. यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमा व्हावे, असे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुरेश दुधगावकर होते. 

live update -

खटाव (ता. मिरज) येथे सकाळी आठवडी बाजार बंद पाडला. किरकोळ दगडफेक झाली. सलगरे (ता. मिरज) येथे शांततेत गाव बंद निषेध फेरी काढण्‍यात आली