Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगली : विजेच्या धक्‍क्याने माय-लेकरासह तिघांचा मृत्यू

सांगली : विजेच्या धक्‍क्याने माय-लेकरासह तिघांचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्‍लापूर : वार्ताहर

वाळवा तालुक्यातील येलुर येथे विजेच्या धक्‍क्याने माय लेकरांसह तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभाकर लक्ष्‍मण महाडिक (३५), छाया लक्ष्‍मण महाडिक (५५) रा. येलुर आणि प्रकाश भिमण्‍णा मगदूम (५१) रा. मेंडीगिरी, ता. जत अशी मृतांची नावे आहेत. आज (दि. ३१) रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

येलुर येथे शेतात विजेची तार तुटून पडली होती. या तारेला स्‍पर्श झाल्याने विजेचा धक्‍का बसून तिघेजण जागीच ठार झाले. तर दोघेजण सुदैवाने बचावले. या घटनेनंतर ग्रामस्‍थांमध्ये महावितरणच्या विरोधात असंतोष असून मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे. 


  •