Thu, Aug 22, 2019 15:16होमपेज › Sangli › सलगरेतील दुकानातून दीड लाखांची रोकड लांबवली

सलगरेतील दुकानातून दीड लाखांची रोकड लांबवली

Published On: May 16 2019 2:11AM | Last Updated: May 16 2019 12:25AM
लिंगनूर : वार्ताहर

सलगरे ( ता. मिरज ) येथे भुरट्या   चोर्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. सोमवारी रात्री दोन मेंढ्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना ताजी असताना पुन्हा काल मंगळवारी रात्री तीन ठिकाणी चोर्‍या झाल्या.   एका कृषी ठिबक सिंचन साहित्य विक्रेत्याच्या दुकानातील दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. तर एका कँटीन स्वरूपात असणारे दुकान आणि कॉलेजमध्येही चोरीचा प्रयत्न चोरट्याने केला आहे.

सलगरे येथील एका कृषी आणि ठिबक सिंचन साहित्य विक्री करणार्‍या दुकानाच्या खिडकीचे ग्रील कापून चोरटा आत शिरला. कवठेमहांकाळ रस्त्यावर असणार्‍या या दुकानातून समोरील बाजू, पश्चिम आणि उत्तर बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने दक्षिण बाजूचा सुरक्षित मार्ग निवडून या बाजूच्या खिडकीचे ग्रील तोडून आत चोरट्याने प्रवेश केला.

आत कॅश कौंटर सहज निघत नसल्याने पहारेचा वापर करीत कौंटर उचकटुन काढून आतील रोख सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम त्या चोरट्याने लांबवली आहे. याबाबत   नितीन गडदे यांनी ही माहिती दिली. शिवाय चोरीत वापरलेली पहार दुकानातच चोरट्याने सोडली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एकटाच चोरटा दुकानात वावरल्याचे दिसत असून त्याने तोंडाला रुमाल बांधून सावध चोरी केली आहे. पण रोख रक्कम वगळता अन्य साहित्य चोरट्याने चोरले नाही .  

चोरट्याने येथील एका महाविद्यालयाच्या कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील सर्व व्यवहार अकौंटवर आणि धनादेशने होत असल्याने येथे त्याला रोख रक्कम सापडली नाही. मात्र इतर शैक्षणिक फाईल आणि कागदपत्रे यांना त्याने नुकसान केले नाही.  याच परिसरात असणााया एक कँटीन वजा दुकानातील रोख चिल्लर 280 रुपये चोरले आहेत, अशीही माहिती मिळाली.