Sat, Jul 20, 2019 08:59होमपेज › Sangli › सांगलीत बंद फ्लॅट फोडला

सांगलीत बंद फ्लॅट फोडला

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

येथील विश्रामबाग गणपती मंदिरा जवळ दिलीप वसंतराव केडगे(वय 60, रा. महाशिव अपार्टमेंट) यांचा फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडला. घरातून 11 तोळे सोन्याचे आणि 160ग्रॉम वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिलीप केडगे हे निवृत्त कर्मचारी आहेत. पत्नीसह दोघेच घरी असतात. मुलगा पुण्यात नोकरीस आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान ते फिरायला गेले होते. पत्नी बाजारात गेल्या होत्या. तोपर्यंत चोरट्याने समोरील दरवाजाचा  कडी - कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटाचा शोध घेतला. मात्र चोरट्यांना काही मिळाले नाही. त्यानंतर लाफ्टवर शोधले  असता दागिने मिळाले.  पाच तोळ्यांचे तोडे आणि 6 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्याशिवाय 60 ग्रॅमचे पैंजण आणि 100 ग्रॉम वजनाच्या मेखला होता. चोरट्यांनी या किंमती वस्तू घेऊन पोबारा केला. 

केडगे  परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या पथकाने तात्काळ धाव घेऊन त्या ठिकाणी पाहणी केली. दरवाजा आणि कपाटावरील ठसे घेतले. त्या शिवाय डॉगच्या साह्याने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.