Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Sangli › तासगावात दरोड्याचा प्लॅन फसला; चोरटे CCTVत कैद

तासगाव : दरोड्याचा प्लॅन फसला; चोरटे CCTVत कैद

Published On: Sep 08 2018 10:15AM | Last Updated: Sep 08 2018 10:20AMसांगली : पुढारी ऑनलाईन

तासगाव शहरातील पुनदी रोड येथील शिवाजी नगरमध्ये दरोड्याचा प्लॅन फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना दरोडा टाकता आला नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री दीडच्या सुमारास शिवाजी नगरमध्ये चोरटे दरोड्याच्या तयारीत होते. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ७ चोरट्यांचा डाव फसला. ते सातही जण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यापैकी एकाचा चेहरा दिसत आहे. 

दरम्यान दरोड्याच्या प्रकारामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण  झाले आहे. चोरटे तासगाव शहर परिसरातील असल्याची चर्चा सुरु असून या प्रकरणाचा अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्या घेतले आहे.