Sun, May 26, 2019 12:55होमपेज › Sangli › वॉन्लेसवाडीत अतिक्रमण काढलेला भूखंड मंदिराला

वॉन्लेसवाडीत अतिक्रमण काढलेला भूखंड मंदिराला

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 20 2018 1:50AMसांगली  : प्रतिनिधी

वॉन्लेसवाडी येथील मंदिराचे अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा तोच भूखंड मंदिराच्या ट्रस्टला देण्याचा प्रस्ताव एक (ज) खाली महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी होणार्‍या महासभेसमोर तो आहे. यासह मिरजेत पाच-सहा घरांच्या नावे साडेतीन एकरांवरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव महासभेसमोर आहे. यामुळे पुन्हा भूखंड घोटाळ्यांचा पंचनामा अपेक्षित आहे.

वॉन्लेसवाडीतील भूखंडावर बाळूमामा मंदिराचे अतिक्रमण होते. ते महापालिकेने नुकतेच हटविले आहे. असे असताना पुन्हा नगरसेविका प्रियांका बंडगर यांच्या सूचनेनुसार हा भूखंड श्री बाळूमामा बहुउद्देशीय सेवा संंस्था (वॉन्लेसवाडी) यांना देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सामाजिक उद्दिष्टासाठी भाडेमूल्याने द्यावा, अशी सूचना केली आहे. वास्तविक एकीकडे मंदिरांचे अतिक्रमण हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असताना पुन्हा हा भूखंड संबंधित धार्मिक संस्थेला देण्याचा उद्योग कशासाठी, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यावरून महासभेत वादंग होणार आहे.

नगरसेवक संजय मेंढे यांनी मिरजेतील सर्व्हे क्रमांक 399/1 ते 6 या जागेवरील  आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव दिला आहे. वास्तविक जागेवर 458 क्रमांकाने आरक्षण आहे. परंतु तेथे घरे झााल्याचे कारण देत त्यावरीलही गुंठेवारी कायद्याखाली आरक्षण उठविण्याची मागणी केली आहे. मागील महाभेतही मिरजेतील सुमारे साडेतीन एकराचे आरक्षण उठविण्याचा ठराव घुसडण्यात आल्याचा राष्ट्रवादीने केला आहे. तो ठराव रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्‍तांकडे मागणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकूणच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भूखंड बाजार फोफावल्याचे स्पष्ट होत आहे. यातून पुन्हा महासभेत हे विषय वादळी ठरणार आहेत.

कॉलेज कॉर्नरवर खाऊगल्ली  सांगलीतील कॉलेज कॉर्नरवर हातगाडे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्याचा गराडा पडला आहे. तो तेथील लगतच्या रस्त्याला खाऊगल्ली तयार करून पुनर्वसन करण्यासाठी माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांनी प्रस्ताव दिला आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा रखडलेल्या फेरीवाला धोरणाचा विषय ऐरणीवर येणार आहे.
 

tags : temple, demolish,encroachment,proposal,of same, land,allotment,temple,Wallacewadi,