Sun, Aug 25, 2019 23:25होमपेज › Sangli › ‘कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका नको’

‘कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका नको’

Published On: Jun 19 2018 2:40PM | Last Updated: Jun 19 2018 2:40PMविटा : प्रतिनिधी 

कुणाला तरी बरं वाटावं म्हणून टेंभूबाबत माझ्यावर टीका करु नका. आता आपण ज्या पदावर आहात त्या कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीने माहिती घ्या आणि बोला असा वडिलकीचा सल्ला खासदार संजय पाटील यांना आमदार अनिलराव बाबर यांनी दिला. ते म्हणाले की, टेंभूचे पाणी या दुष्काळी भागाला मिळावे हे दिव्य स्वप्न घेऊन मी आजवर वाटचाल केली. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. मात्र, टेंभूला दिवास्वप्न म्हणणाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी शौचालाय आणि पीक-अप शेडसुद्धा सोडली नाहीत. त्यांनी माझ्यावर टीका करताना भान ठेवावे असा सज्जड इशारा आमदार बाबर यांनी माजी आमदार सदाशिराव पाटील यांना दिला. 

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार संजय पाटील यांचा सत्कार विटा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी टेंभू योजनेच्या कामाचे श्रेय आणि त्याची प्रसिद्धी करतात जणू यांच्या कोंबड्यामुळेच टेंभू योजना पूर्ण होत आहे असा त्यांचा समाज आहे. तो खासदारांनी दूर करावा अशी टीकाही यावेळी आमदार बाबर यांच्यावर केली होती. त्याबाबत आमदार बाबर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, सत्काराबद्दल काही तक्रार नाही पण अनावश्यक पद्धतीने टीका झाली. मी पेपर बाजी करतो, प्रसिद्धी जास्त करतो. तुम्ही पण या योजनांमध्ये काम केले आहे. जे काम घडलय, लोकांच्या हिताचे आहे खासदारांना चुकीचे भासवून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. खासदार साहेबानासुद्धा माहिती आहे. माझी टेंभू असेल किंवा अन्य पाणी योजनांच्या पाठ पुरावा आणि मला शक्य आहे तेवढे प्रयत्न करण्याची मतदार संघापुरती आग्रहाची भूमिका राहिलेली आहे.

जिल्ह्यातल्या विकास कामाबाबत असो, विटा शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा अन्य विकास कामाबाबत आपण कधीही विरोधी भूमिका अगर आडकाठी केली नाही. विधिमंडळातसुद्धा पूरक भूमिका मी घेत आलेलो आहे. खासदारांनासुद्धा माझी विनंती आहे, कुणाला बरं वाटो किंवा चुकीचे वाटो, जनतेसाठी सिंचन व्यवस्था वाढवणे हे काम करीत राहणार. चुकीच्या माहितीवर आधारित टीका करू नका. गरज असेल तर टेंभूबाबत कुणी प्रयत्न आणि काम केले याची माहिती घ्या. यावेळी त्यांनी टेंभूबाबत विरोधकांना चर्चा करण्यासाठी खुले आव्‍हान केले.

 एकीकडे भारतीय जनता पक्षाचे वरचे नेते काँग्रेस मुक्त भारत ही भूमिका राबवत आहेत पण या मतदार संघात काँग्रेस युक्त भूमिका विटा शहरापुरती किंवा या मतदार संघ पुरती कशी काय भाजपने घेतली आहे. माझ्या काय लक्षात येत नाही असे उपरोधिक भाष्यही आमदार बाबर यांनी केले तर माजी आमदार पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले. टेंभू योजना माझे स्वप्न आहे, दिवा स्वप्न नाही. त्यामुळे त्या स्वप्नपूर्ततेसाठी मला जे कष्ट करावे लागत आहेत ते लोकांच्या प्रयन्त पोहोचवणे मी काही गैर मानत नाही आणि न केलेल्या कामाचे त्याचे श्रेय घेण्याचे काम मी कधीही करत नाही. तुमचा १० वर्षांचा कालावधी आठवा, न केलेल्या कामाची तसेच एकेका कामाची दोन दोनदासुद्धा प्रसिद्धी तुम्ही केलेली आहे. पिक अप शेड, शौचालयेसुद्धा तुम्हाला प्रसिद्धीसाठी पुरली नाहीत अशांनी माझ्यावर टीका करताना भान ठेवावे. चार दिवसांपूर्वी तुमच्या पक्षाच्या मुंबईत कार्यक्रमातले टिळक भवनातले तुमचे फोटो पेपरात झळकतात आणि चार दिवसांत तुम्हाला भाजपच्या युती सरकारच्या कामाचं कौतुक करावं वाटलं. त्यामुळे तुमची एकदा भूमिका पक्की ठरवा अशी टीकाही त्यांनी केली.