Wed, Jul 17, 2019 20:34होमपेज › Sangli › शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू

शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू

Published On: Jul 07 2018 11:08AM | Last Updated: Jul 07 2018 11:08AMसांगली : प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविण्यात येणार आहे. हे पोर्टल शुक्रवारी सुरू झाले. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झालीआहे.  शिक्षण सेवक भरतीची कार्यवाही ई-गव्हर्नन्स सेलद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. ‘पवित्र’चे कामकाज सुरू झाले आहे.   

शिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांवरून भरती होणार आहे. त्याअनुषंगाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निश्‍चित केलेले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्‍चित केलेला आहे. दि 6 जुलै ते 23 ऑगस्ट 2018 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे. 

वाचा : शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू; असा भरा फॉर्म

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे म्हणाले, पवित्र पोर्टलवर प्रत्येक पातळी/स्तरावर माहिती भरण्यासाठीचे मार्गदर्शन शिबीर शनिवारी सकाळी 11 वाजता विलिंग्डन महाविद्यालयात वेलणकर सभागृहात होणार आहे. मुख्याध्यापकांनी या शिबीराला येताना संस्थेने मागासवर्गीय कक्षकडून तपासलेला रोष्टर उतारा (तीन वर्षांच्या आतील) झेरॉक्स प्रत आणावी. ज्या संस्थांनी रोष्टर अद्यावत केले नसेल त्यांनी तात्काळ तशा प्रकारची कार्यवाही करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी केले आहे. 

उमेदवारांसाठी आज प्रशिक्षण शिबीर

शिक्षणाधिकारी चोथे म्हणाले, पवित्र पोर्टलद्वारे उमेदवार, संस्था व शासन स्तरावरून माहिती भरून घेऊन कार्यवाही करायची आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये माहिती अचूक भरण्यासाठी शनिवारी दुपारी 2 वाजता विलिंग्डन महाविद्यालयात वेलणकर सभागृहात प्रशिक्षण शिबीर होणार आहे. जिल्ह्यातील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा. 

उमेदवारांना पवित्र नोंदणीसाठीचे वेळापत्रक 

दि. 6 ते 8 जुलै : एसईडी टीएआयटी 0000001 ते 0005000
दि. 9 ते 11 जुलै : एसईडी टीएआयटी 0005001 ते 0015000
दि. 12 ते 15 जुलै : एसईडी टीएआयटी 0015001 ते 0030000
दि. 16 ते 18 जुलै : एसईडी टीएआयटी 0030001 ते 0045000
दि. 19 ते 22 जुलै : एसईडी टीएआयटी 0045001 ते 0060000
दि. 23 ते 25 जुलै: एसईडी टीएआयटी 0060001 ते 0075000
दि. 26 ते 29 जुलै : एसईडी टीएआयटी 0075001 ते 0090000
दि. 30 जुलै ते 1/8 : एसईडी टीएआयटी 0090001 ते 0105000
दि. 2 ते 5 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0105001 ते 0120000
दि. 2 ते 5 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0120001 ते 0135000
दि. 9 ते 12 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 012001 ते 0150000
दि. 13 ते 15 ऑगस्ट :एसईडी टीएआयटी 0150001 ते 0165000
दि. 16 ते 19 ऑगस्ट: एसईडी टीएआयटी 0165001 ते 0180000
दि.20 ते 23 ऑगस्ट : एसईडी टीएआयटी 0180001 ते 0199143