Tue, Nov 20, 2018 13:12होमपेज › Sangli › शिक्षण खासगीकरणा विरोधात शिक्षक, संस्थाचालक रस्त्यावर  

शिक्षण खासगीकरणा विरोधात शिक्षक, संस्थाचालक रस्त्यावर  

Published On: Jan 20 2018 7:34PM | Last Updated: Jan 20 2018 7:34PMसांगली : प्रतिनिधी  

राज्यातील शिक्षण क्षेत्र खासगी कंपन्यांना देण्याचा घाट  घातला आहे, तो थांबवावा. १० विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, वेतनेत्तर अनुदान त्वरीत द्यावे, आदी मागण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालक आज रस्त्यावर उतरले. सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे या मागण्यासाठी   विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चो काढला. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. 

दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास  परिक्षावर बहिष्कार घालण्याचा आणि शाळा इमारतींना कुलूप  लावण्याचा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिला. सरकार विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

दुपारी दोनच्या सुमारास क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली. मोर्चामध्ये माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, महाराष्ट राज्य मुख्याद्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, राज्य शिक्षण संस्था संघटनेचे खजिनदार रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे, एस. डी. लाड, सुभाष माने, राजेंद्र नागरगोजे, अशोक थोरात, विनायक शिंदे, रघुनाथ सातपुते आदी सहभागी झाले होते. त्या शिवाय सांगली शहरासह जिल्ह्यातील शिक्षकही मोठ्या संख्येंने आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध नेत्यांची भाषणे झाली.