Tue, Jul 16, 2019 21:51



होमपेज › Sangli › शिक्षक खून: तपास संथ गतीने

शिक्षक खून: तपास संथ गतीने

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:33PM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

शहरातील शास्त्री चौकात झालेल्या शिक्षक सुनील आंबी यांच्या खूनप्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान याप्रकरणातील एका संशयिताचे नाव त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगूनही अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान तसापात काहीच प्रगती नसल्याने आंबी समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे.   

याप्रकरणी आठ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर आंबी यांनी फिर्याद दिली आहे. आंबी विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते. दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना अज्ञातांनी मोबाईलवर फोन करून चर्चा करायचे असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, काठीने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना शंभर फुटी रस्ता परिसरात सोडून देण्यात आले होते.  कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दि. 4 जानेवारीरोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान आंबी यांच्या नातेवाईकांनी गेल्या आठवड्यात शनिवारी निरीक्षक शेळके यांची भेट घेऊन हल्लेखोरांनी सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केल्याची तक्रार केली. त्यानंतर हल्लेखोरांवर दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एका संशयिताचे नावही पोलिसांना सांगितले होते. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. संबंधितांकडे केवळ चौकशीच सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे.