Mon, Dec 17, 2018 15:05होमपेज › Sangli › उसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला ठार

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला ठार

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:35PM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

मणेराजुरी-सांगली रस्त्यावर शुक्रवारी ऊस ट्रॉलीखाली सापडून चंद्रकला हरिदास पाटील (वय 45, रा. कवलापूर, ता. मिरज)  ही  महिला जागीच ठार झाली. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाला. त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तानाजी जमदाडे (रा. मणेराजुरी) यांनी फिर्याद दिली.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः चंद्रकला यांचे माहेर मणेराजुरी आहे. वडिलांची तब्येत बिघडल्याने त्या त्यांना पाहण्यासाठी पती हरिदास पाटील व अकरा महिन्याचा मुलगा पियुष यांच्यासोबत दुचाकी (एम.एच. 10 सी. 6196) वरुन चालल्या होत्या. 

मणेराजुरी - सांगली रस्त्यावर चढावरून ऊस भरलेला ट्रॅक्टर (एम.एच. 10 एस. 4604) जात होता. दुचाकी त्याठिकाणी आल्यानंतर चढ असल्याने ट्रॉली अचानक हलली. यामुळे ट्रॉलीमध्ये असणारा ऊस चंद्रकला पाटील यांच्या डोक्याला लागला.  त्या व पियुष दुचाकीवरून खाली पडल्या व ट्रॉलीचे मागील चाक पाटील यांच्या अंगावरुन गेले.  दरम्यान, पियुषला हरिदास पाटील यांनी चपळाईने बाजूला ओढल्याने तो बचावला.  सहायक पोलिस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.