Fri, Jul 19, 2019 16:10होमपेज › Sangli › पुणदीजवळ अपघातात महिला ठार; पती गंभीर  

पुणदीजवळ अपघातात महिला ठार; पती गंभीर  

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 11:15PM

बुकमार्क करा
तासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव-पुणदी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी शहरापासून अडीच किलोमीटर  अंतरावर कारने  मोटारसायकलला धडक दिल्याने  वैशाली रमेश गोसावी (वय 36, रा. पुणदी) या ठार झाल्या. त्यांचे पती रमेश श्रीरंग गोसावी गंभीर जखमी झाले. 

याप्रकरणी कारचालक अमित दत्तात्रय पाटील (रा. मोराळे) याच्या विरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश व वैशाली दुचाकी (एमएच 10 एके 6341) वरून तासगावला  निघाले होते. अमित पाटील यांची कार (एमएच 25 आर 4089) तासगावच्या दिशेने येत होती. कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. दुचाकीवरील गोसावी पती-पत्नी रस्त्यावर आदळले. वैशाली या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मोठा रक्‍तस्राव झाल्यानेत्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.