Wed, Jan 29, 2020 23:46होमपेज › Sangli › लाच घेताना पाटबंधारेचा शाखा अभियंता जाळ्यात

लाच घेताना पाटबंधारेचा शाखा अभियंता जाळ्यात

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 12 2017 12:06AM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

मिरजेच्या लघुपाटबंधारे विभागातील लिपिकाकडूनच दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय 34, रा. मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिराजवळ, सांगली) याला पकडण्यात आले. सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. 

तक्रारदार हा मिरजेच्या पाटबंधारे विभागात लिपीक आहे. त्या लिपिकाने तयार केलेल्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी त्याच्याकडे याच विभागात (म्हैसाळ वर्ग 2) मध्ये शाखा अभियंता असणार्‍या अकोलकर याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे त्या लिपिकाने  सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

अकोलकर याने लिपिकाकडून दहा हजार रुपये घेतले. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत अधिक तपास निरीक्षक हरिदास जाधव करीत आहेत. मिरजेत यापूर्वी अनेकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी सापडले आहेत. मात्र, एका अधिकार्‍याच्या विरोधात त्याच विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याने कधी तक्रार दिली नव्हती. मात्र, पहिल्यांदाच मिरजेत कर्मचार्‍याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले.