Mon, Aug 19, 2019 18:49होमपेज › Sangli › सांगली : वालचंद महाविद्यालयात शोकसभा

सांगली : वालचंद महाविद्यालयात शोकसभा

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:25PMसांगली ः प्रतिनिधी

शिवजयंतीनिमित्त ज्योत आणण्यासाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना मंगळवारी शोकाकूल वातावरणात आदरांजली वाहण्यात आली. ज्या टिळक सभागृहात कार्यक्रम होणार होता त्याच सभागृहात मृत विद्यार्थ्यांचे प्रतिमापूजन करावे लागल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना अश्रू अनावर झाले. 

पन्हाळा येथून शिवज्योत घेऊन येताना सुमित कुलकर्णी, सुशांत पाटील, प्रणित तिरलोटकर, अरूण भोंडणे, केतन खोचे, प्रतीक संकपाळ या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजताच संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर शोकसागरात बुडाला होता. मंगळवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जी. व्ही. परिश्‍वाड म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी आहे. खासदार संजय पाटील, दीपक शिंदे,  रवि पुरोहित, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ उपस्थित होते. 

परीक्षा पुढे ढकलल्या...

या दुर्दैवी घटनेमुळे मंगळवारी महाविद्यालयाचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या आठवड्यात डिप्लोमाच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र त्या एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे संचालक जी. व्ही. परिश्‍वाड यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.