Fri, Jan 18, 2019 09:58होमपेज › Sangli › विद्यार्थी वाहतूक देखरेखीस शिक्षक नियुक्ती करा : अधीक्षक सुहेल शर्मा

विद्यार्थी वाहतूक देखरेखीस शिक्षक नियुक्ती करा : अधीक्षक सुहेल शर्मा

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 8:06PMसांगली : प्रतिनिधी

विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची कागदपत्रे, विद्यार्थी संख्या याची शाळांची तपासणी करावी. त्यावर देखरेखीसाठी एका शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिल्या. 

जिल्हा स्कूल सुरक्षा समितीची बैठक अधीक्षक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, एस. टी. च्या विभागीय वाहतूक नियंत्रक एस. व्ही. ताम्हणकर, उपशिक्षणाधिकारी ए. एन. म्हेत्रे, शिक्षक, पालक उपस्थित होते. 

शर्मा म्हणाले,  आपण आपल्या पाल्याची ज्याप्रमाणे लहानपणापासून काळजी घेतो, त्या पद्धतीने तो शाळेत कशा पद्धतीने जातो, याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची कागदपत्रे आहेत का, त्यामध्ये किती विद्यार्थी असतात याची शाळांनी तपासणी करावी. त्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती करावी.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे यांनी परिवहन समितीची रुपरेखा सांगितली. उच्च न्यायालयाच्या नियमानुसारच विद्यार्थी वाहतूक करावी, असे सांगितले.