Thu, Jun 27, 2019 14:07होमपेज › Sangli › अपघातात विद्यार्थी ठार; चालकाची आत्महत्या

अपघातात विद्यार्थी ठार; चालकाची आत्महत्या

Published On: Feb 04 2018 11:24AM | Last Updated: Feb 04 2018 11:24AMकेज/अंबासाखर : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा देऊन परतणार्‍या विद्यार्थ्याच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या  धक्क्याने टेम्पोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाईजवळ मोटारसायकलच्या धडकेत मायलेकीचा, तर बीड बायपासवर दोन ट्रकच्या अपघातात क्‍लिनरचा मृत्यू झाला.

नेकनूर-केज रस्त्यावर बरड फाटा येथे घडला. नांदूरफाटा येथील विकास अशोक ठोंबरे (वय 18) हा सारणी सांगवी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रात्यक्षिक परीक्षा  दिल्यानंतर सारणी सांगवी येथून मोटारसायकलवर (एम.एच.23 आर.4804) तो नांदूरफाट्याकडे निघाला होता. टेम्पोने (एम.एच.23 7508) मोटारसायकलला धडक दिल्याने विकास ठोंबरे हा जागीच ठार  झाला.चालक अशोक आत्माराम कानडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

अंबाजोगाईच्या घटनेत जखमी माय-लेकींना लोकांनी तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले.तेथून त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री 11.30 वाजता शालिनी बत्तीशे यांचा तर प्रियांकाचा मध्यरात्री 2.30 वाजता मृत्यू झाला. शालिनी यांना तरुण मुलगा असून, पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. दुसर्‍या अपघातात धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकला (एम.एच.16 क्यू.7507) समोरून येणार्‍या ट्रकने (आर.जे.20 जी.बी.4172) धडक दिली. त्यात क्लिनर गोगा कांबळे (वय 30, रा. केज)  यांचा जागीच मृत्यू झाला.

अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयासमोर झालेल्या अपघातात शालिनी राजेंद्र बत्तीशे (वय 32) आणि त्यांची मुलगी प्रियांका (वय 12) (रा. मोरेवाडी) या दोघी ठार झाल्या.  दुसर्‍याच्या घरी धुणीभांडी करून त्या आपली गुजराण करत होत्या. कृषी महाविद्यालासमोरून त्या जात असताना समोरून अतिशय वेगाने येणार्‍या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात  दोघी मायलेकीच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या.