होमपेज › Sangli › गाडीला बाजू न दिल्याने ट्रकवर दगडफेक

गाडीला बाजू न दिल्याने ट्रकवर दगडफेक

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 23 2018 12:20AMमाडग्याळ : वार्ताहर    

संख(ता,जत)  येथे कारला  ट्रक चालकाने  बाजू दिली नाही म्हणून  जोरदार वाद झाला. पाठलाग करून माडग्याळनजिक ट्रकची तोडफोड करण्यात आली. टायर कापण्यात आले. तसेच समोरील काचा   पूर्णपणे फोडण्यात आल्या. ट्रकचालकाचा सात ते आठ जणांनी पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा जीव बचावला.माडग्याळ येथील सातापगोळ वस्तीवर राहणार्‍यांना  नेमका दंगा कशाचा सुरू आहे हे सुरुवातीस समजले नाही. त्यांन दरोडेखोर आले असावेत, असा  संशय आला होता. परंतु खरा प्रकार सजल्यानंतर वातावरण शांत झाले. ट्रकचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद पोलिसांत न करता परस्पर प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा आहे.

कोळगिरी येथील अण्णेश हेळवी याचे   गावातच संजीवनी पॅकेजिंग सेंटर आहे. हेळवी यांचा ट्रक पॅकिंग मटेरियल आणण्यासाठी विजापूरला गेला होता. तो गावाकडे परत  येत होता.  चालक संखमधील नातेवाईकाला भेटण्यास गेला होता. नातेवाईकांच्या घराजवळील रस्त्याने येत असताना समोरून टाटा सफारी गाडी येत होती.बाजू देण्यावरून दोन्ही वाहनांच्या चालकांचा जोरदार वाद झाला.त्यानंतर ट्रकचालक कोळगिरीकडे जाण्यास निघाला होता. सफारीमध्ये असलेल्या सात ते आठ जणांनी ट्रकचा पाठलाग करून माडग्याळ येथील सातापगोळ वस्तीजवळ  

ट्रक अडवला.त्यानंतर ट्रकवर अचानक जोरदार दगडफेक सुरू झाली. ट्रकचालकाच्या अंगावर काहीजण धावून गेले. जीव वाचवण्याच्या भीतीने तो  पळू लागला.त्यावेळी त्याचा आठ जणांनी पाठलाग केला.पण चालक पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.दगडफेकीच्या आवाजाने या परिसरातील वस्तीवर भीतीचे  वातावरण निर्माण झाले होते.ट्रकचालक न सापडल्याने रागाच्या भरात  ट्रकच्या टायर कापण्यात आले. समोरील काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. चारचाकी सफारीहून आलेले आठजण पसार झाले.

Tags : Sangli, Sangli News, stone pelting, on truck, because, dont give side ,to other car