Tue, Mar 19, 2019 03:24होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यामध्ये मुलाकडून बापाचा खून

तासगाव तालुक्यामध्ये मुलाकडून बापाचा खून

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:12AMतासगाव : शहर प्रतिनिधी

वडगाव (ता. तासगाव) येथे मंगळवारी रात्री सावंता दशरथ ढोबळे (वय 55)  आणि त्यांचा मुलगा सुशांत ( वय 30)  यांच्यात   वादावादी झाली. त्यावेळी मुलाने भिंतीवर ढकलून दिल्याने डोक्याला मार लागून सावंता यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी सुशांत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी ही माहिती दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी ःवडगाव येथे ढोबळे हे पत्नी, मुलगा सुशांत, सून यांच्यासह राहत होते. त्यांचा दुसरा मुलगा हा पुणे येथे नोकरी करतो. मंगळवारी सायंकाळी पत्नी व सून दोघीही घरात नव्हत्या. सावंता व सुशांत यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी सुरू झाली. यावेळी मुलाने त्यांना मारहाण करुन भिंतीवर ढकलून दिले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला.

बुधवारी सकाळी आठ वाजले तरी सावंता ढोबळे उठले नाहीत, त्यामुळे सुशांतने पाहिले असता त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याने समजले. पोलिस पाटील अर्चना विशाल पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. 

दरम्यान बुधवारी रात्री  शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामध्ये डोक्याला मार लागल्याने सावंता यांचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले. मात्र याप्रकरणी फिर्याद देण्यास ढोबळे यांच्या कुटुंबियांनी नकार दिला. त्यामुळे तासगाव पोलिसांनीच फिर्याद   दिली असल्याचे उपअधीक्षक  बनकर यांनी सांगितले.