होमपेज › Sangli › बालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन

बालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन

Published On: Jul 12 2018 10:06AM | Last Updated: Jul 12 2018 10:06AMसांगली : प्रतिनिधी

बालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी (वय, ८९)यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती ढासल्‍यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून त्‍यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. 

श्रीनिवास शिंदगी यांनी गेली ६० वर्ष ही बालरंगभूमिची चळवळ अविरत चालू ठेवली आहे. या चळवळीच्या माध्यमातून शेकडो बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे त्‍यांनी दिले आहेत. पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा,  भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी, यासारखी त्‍यांची अनेक नाटकं गाजली आहेत. शिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजन पुढे कलाकार दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक झाले आहेत. शिंदगी यांचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून नाटककार केशवराव दाते यांनी ‘ बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपादी त्‍यांना दिली होती. शिंदगी यांनी अनेक कथा, कविता, कविता संग्रह,  गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत.  बालनाट्या बरोबरच त्यांच व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे.  मराठी रंग भूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्डच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनी केला. 

निवास शिंदगी यांनी आजवर २० नाटके लिहिली  आहेत त्यापैकी १५ बालनाट्ये आहेत. त्यांचे पुंगीवाला हे नाटक इतक्या उच्च अभिरुचीचे होते की ते ख्यातनाम अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार गेल्या ६० वर्षापासून घडवण्याचे काल केले आहे.

साहित्य,  लेखन, अभिनय याबरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारावतन, वंदे मातरत हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार करून त्याचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. या कार्यक्रमांच्या ध्वनिफितीही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळूया याही ध्वनिफितींची त्यांनी  निर्मिती केलेली आहे.

श्रीनिवास शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘ भूमिपुत्रांचे वनपूजन ‘ हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्यशासनाचा उत्कृष वाड;मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला आहे.