Fri, Mar 22, 2019 00:22
    ब्रेकिंग    



होमपेज › Sangli › बाजार समिती सचिवांनी दिला त्रास; अडत्याची आत्‍महत्या

बाजार समिती सचिवांनी दिला त्रास; अडत्याची आत्‍महत्या

Published On: Jan 12 2018 3:50PM | Last Updated: Jan 12 2018 3:50PM

बुकमार्क करा




 

तासगाव : पुढारी ऑनलाईन

तासगाव बाजार समिती सचिवांच्या त्रासास कंटाळून अडत दुकानदाराने आत्‍महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसिंग जयसिंग पाटील (वय ४७, रा. पुनदी) असे विष प्राशन करून आत्‍महत्या केलेल्या अडत दुकानदाराचे नाव आहे. बाजार समितीचे सचिव चंद्रकांत हिंदुराव सुर्यवंशी याच्या विरोधात आत्‍महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

मानसिंग यांनी आत्‍महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी सापडली आहे. यात बेदाणा व्यापारात तासगाव बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आर्थिक त्रास दिल्याचे म्‍हटले आहे. तसेच बेकायदेशीरपणे २० ते २२ लाख रुपये व्याज वसूल केले. या सततच्या आर्थिक त्रासाला कंटाळून आत्‍महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे. याप्रकरणी चंद्रकांत सूर्यवंशी विरोधात आत्‍महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्‍हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.