Tue, Mar 19, 2019 05:26होमपेज › Sangli › मोदी, कमळाला लोक कंटाळले

मोदी, कमळाला लोक कंटाळले

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:35PMमिरज : शहर प्रतिनिधी 

नरेंद्र मोदी आणि कमळाला लोक आता कंटाळून गेले आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना कोणीही जवळ करणार नाही. त्याना कंटाळलेले शिवसेनेला साथ देतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केले.

येथील बालगंधर्व नाट्यगृहात  शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात किर्तीकर बोलत होते. उपनेते नितीन- बानुगडे पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार  उपस्थित होते. 15 एप्रिल रोजी सांगलीतील मेळाव्यात अत्यल्प संख्येने कार्यकर्ते पाहून भडकलेल्या खासदार किर्तीकर यांनी दोन्ही जिल्हा संघटकांच्या हकालपट्टीची भाषा केली होती. पंधरा दिवसांत दुसरा मेळावा घेऊन यशस्वी करुन दाखवण्याचे आवाहनही केले होते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी बालगंधर्व नाट्यगृहात मेळाव्याचे आयोजन केले होते.

  खा. किर्तीकर म्हणाले, कोणाच्याही हकालपट्टीचा किंवा स्वीकार करण्याचा अधिकार मला नाही. तो फक्त कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच आहे. आजच्या गर्दीप्रमाणे प्रामाणिपणे काम केले तर महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील सव्वीस जागांची जबाबदारी माझ्यावर आहे. सध्या या ठिकाणी आठ आमदार आहेत. येत्या विधानसभेत त्याचे सोळा करायचे आहेत.

नितीन- बानुगडे पाटील, म्हणाले,   भाजप सरकारने कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे म्हणायची वेळ आणली आहे. शिवसेनेत एकाही नेत्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. या ताकदीवरच आगामी विधानसभेत भगवा झेंडा स्बबळावर फडकेल. बानुगडे-पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार लादणार नाही. यावेळी शहर प्रमुख विशालसिंग रजपूत, चंद्रकांत मैगुरे, शेखर माने, रावसाहेब घेवारे, तानाजी सातपुते, शंभुराज काटकर, दिगंबर जाधव, सुनीता मोरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, अमोल पाटील, प्रदीप कांबळे उपस्थित होते.