Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Sangli › सांगली झाली शिवमय     

सांगली झाली शिवमय     

Published On: Feb 19 2018 7:31PM | Last Updated: Feb 19 2018 7:31PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की.... जय जय भवानी - जय शिवाजी....आदी घोषणांचा जयघोष, लेझीम, झांजपथक यासह विविध वाद्यांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका आदीनी शहरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. तर घरोघरी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.   

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू होती. रविवारी रात्री बारा वाजता शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, संजय देसाई, आसिफ बावा, आश्रफ वांकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते. पुतळ्याचे पूजन केल्यानंतर तरूणांच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

बहुजन प्रतिपालक शिवमहोत्सव समितीने  घरोघरी शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सकाळी सहा ते नऊ या वेळीत अनेकांनी घरी शिवप्रतिमेचे पूजन केले.  सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, आयुक्त रविंद्र खेबुडकर, माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश दुधगावकर, माजी उपमहापौर युवराज बावडेकर, प्रियानंद कांबळे आदींनी अभिवादन केले. 

स्टेशन चौकात बहुजन प्रतिपालक शिवमहोत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना केली. या कार्यक्रमास महापौर हारुण शिकलगार, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा,  जयश्री पाटील, विशाल पाटील,  पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, शिवसेनेचे युवानेते पृथ्वीराज पवार, डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, आसिफ बावा, अय्याज नायकवडी, विजयराव भोसले, राहुल पाटील, सुधाकर पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, सुनिल गिड्डे, कयूम पटवेगार, नितीन चव्हाण, प्रमोद कुदळे, लालू मेस्त्री, नितीन गोंधळे, युसूफ पठाण, अशोक पवार, उमर गवंडी आदी सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, लेझीम, झांजपथक आदींचा समावेश होता. स्टेशन चौकातून निघालेली ही मिरवणूक - राजवाडा- महापालिका- शिवाजी मंडई- बदाम चौक या मार्गावरून ही मिरवणूक पुन्हा स्टेशन चौकात येऊन त्याची सांगता झाली.