Mon, Aug 19, 2019 11:13होमपेज › Sangli › सांगलीच्या शीतल बंडगर महिलांमध्ये राज्यात पहिल्या

सांगलीच्या शीतल बंडगर महिलांमध्ये राज्यात पहिल्या

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:21AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे 156 गुण मिळवून राज्यात प्रथम आले आहेत. ठाण्यातील प्रमोद केदार यांनी 148 गुण मिळवून मागासवर्गीयांमधून पहिला क्रमांक आणि सांगलीच्या शीतल बंडगर यांनी 141 गुण मिळवत महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोल्हापूरनेही या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.   मागासवर्गीय प्रवर्गातून महिलांमधून मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथील प्र्रज्ञा बाळासो कुरणे यांनी तिसरा, तर गीतांजली साठे यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

7 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. राज्यभरातील विक्रीकर निरीक्षकांच्या 251 पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षेसाठी राज्यभरातून 3 लाख 30 हजार 909 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेकरिता 4430 उमेदवार अर्हताप्राप्त ठरल्यानंतर जानेवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.