Sat, Jul 20, 2019 13:50होमपेज › Sangli › ‘वाकुर्डे’ पूर्ण करण्याचे शासनापुढे आव्हान

‘वाकुर्डे’ पूर्ण करण्याचे शासनापुढे आव्हान

Published On: Dec 03 2017 1:27AM | Last Updated: Dec 02 2017 8:22PM

बुकमार्क करा

शिराळा : विठ्ठल नलवडे

वाकुर्डे योजना ही युती सरकारच्या काळात सुरू झाली. आता ती पूर्ण करण्याचे आव्हान भाजप-सेना सरकार पुढे आहे. या योजनेस 2010 मध्ये पर्यावरण मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी ऑक्टोबर 2010 अखेर 55.29 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. योजनेसाठी सन 2010-11 मध्ये 10.05 कोटी तरतूद असून मागील शिल्लक निधी 40.80 कोटी उपलब्ध आहे. या योजनेची किंमत 675.25 कोटी व अनुषंगिक खर्च 156.27 कोटी असा एकूण 831.52 कोटीवर गेला आहे. 

वाकुर्डे योजनेसाठी टप्पा 1 व 2 च्या पंपगृहांना वीजपुरवठा करण्यासाठी रिळे उपकेंद्रातून वीज उपलब्ध झाली आहे. यासाठी 47 लाखाचा निधी वीज वितरण कंपनीकडे जमा होवून काम पूर्ण झाले. वाकुर्डे रेड हा 28 कि.मी. लांबीच्या कालव्यासाठी आता 66 कोटी रुपयांची गरज आहे. बादेवाडी-बिऊर कालव्यासाठी 2.50 कोटी रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी जवळपास 12.50 कोटीची गरज आहे.

वाकुर्डेचे पाणी खिरवडेतून, हात्तेगाव पंप हाऊसमधून करमजाई धरणात आले. तेथून ते मोरणा धरणात येते. त्यामुळे मोरणा धरण व नदीकाठच्या लोकांना वाकुर्डेचा मोठा फायदा झाला आहे. मोरणा धरणावरील उपसाबंदी उठविण्यासाठी आमदार  शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांनी वारंवार आंदोलन केली.

वाकुर्डे योजना पूर्ण करण्याचे भाजप-सेना सरकार पुढे आव्हान असून केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे. रखडत गेलेली योजना पूर्ण करण्यासाठी जवळपास 1016.31 कोटींची गरज आहे. या योजनेची कामे कराड तालुक्यात जवळपास पूर्ण झाली आहेत. मात्र शिराळा-वाळवा तालुक्यात कामे अपूर्ण आहेत. या योजनेची शिराळा-वाळवा तालुक्यातील सर्व कामे पूर्ण झाली तर हरितक्रांती होणार आहे. त्यामुळे तालुक्यात बागायतीबरोबरच ऊस पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.