Fri, Nov 24, 2017 20:04होमपेज › Sangli › जन्‍मदात्या पित्याकडून ३ वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार

सांगलीत ३ वर्षांची चिमुरडी पित्याच्या वासनांधतेचा बळी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची दिली धमकी  

आरोपीला  बेदम चोपण्याचा जमावाचा प्रयत्न
 


सांगली : प्रतिनिधी

जन्मदात्या पित्याकडून तीन वर्षाच्या मुलीवर चार चाकी गाडीत लैंगीक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. शिवाय संशयीत आरोपीने त्याची व्हिडिओ क्लीप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी पत्नीला दिली. कयूम उस्मान नदाफ(वय ३०, रा. गुरूवार पेठ, मिरज) असे आरोपीचे नाव असून त्याला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. तो खासगी कंत्राटदार आहे. 

दरम्यान, पोलिस  नदाफला न्यायालयात घेऊन येत असताना त्याच्यावर न्यायालयाच्या आवारातच काही सामाजीक आणि राजकीय महिलांच्या जमावाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीस पुन्हा पोलिस ठाण्यात हालवले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रवींद्र शेळके, संजयनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रमेश भिंगारदिवे या ठिकाणी आले.  मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात  करण्यात आला.  हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात हालवण्यात आले.  त्यानंतर बंदोबस्तात  आरोपीस  न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी  जिल्हा सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी आरोपीस तीन दिवसाचा पोलिस कोठडी सुनावली. 

याबाबत पोलिस निरिक्षक शेळके यांनी सांगितले की, कयूम व पत्नी शाहीन यांचा चार वर्षापूर्वी विवाह झाला. दीड वर्षापूर्वीपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे शाहीन या माहेरी जयसिंगपूर येथे राहू लागल्या. तरी सुद्धा  दोघांच्यात समझोता करण्याचे प्रयत्न सुरू होते.   दोघात बोलणे होत होते. आठ सप्टेंबरला कयूमने मोबाईलवर फोन करून पत्नी आणि मुलीला सांगलीतील बसस्थानकावर दुपारी बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या गाडीतून ते विविध ठिकाणी फिरले. रात्री दहाच्या सुमारास कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात आले. त्या ठिकाणी गाडीत कयूमने पाठीमागे येऊन मुलीस नग्न करून चाळे केले. त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढला. त्यातून पत्नी आणि त्याच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी तू कोणाकडे तक्रार केल्यास हे फोटो आणि व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तरी सुद्धा पत्नीने  शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या प्रकाराची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कयूम विरोधात बाल लैंगीक अत्याचाराचा गुन्हा  नोंद केला.  

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आज कयूमला अटक केली.  ही माहिती मिळाल्यानंतर संशयीत आऱोपी आणि फिर्यादी या दोन्ही गटातील लोक राजवाडा चौकात जमा झाले. त्याशिवाय काही  सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या महिलाही आल्या. संशयित आरोपीला चोप देण्याच्या तयारीत होते.  पोलिस आरोपीस गाडीतून घेऊन आल्यानंतर त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी गाडी न थांबवता पुढे घेऊन परत शहर पोलिस ठाण्यात आणली. या गाडीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न झाला. 

या प्रकारानंतर निरिक्षक शेळके,  भिंगारदिवे यांच्यासह पोलिस न्यायालयात आले. मोठा फौजफाटा मागवण्यात आल्या. जमावातील सुनिता मोरे, रेखा पाटील यांच्यासह काही महिलांना ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात हालवण्यात आले. जमाव पांगवण्यात आला. त्यानंतर आरोपीस पाठीमागील दरवाजातून न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी सात दिवसाची कोठडी मागितली. मात्र तीन दिवसाची कोठडी देण्यात आली. 

दरम्यान पोलिसांनी कयूमची चार चाकी गाडी (क्र. एम. एच. १०, सीए. ७५००) ही जप्त केली आहे.

राजवाडा चौकात तणावाचे वातावरण

पित्यानेच अत्याचार केल्याने संशयित आरोपीस चोप देण्यासाठी काही महिला राजवाडा चौकात आल्या होत्या. त्या शिवाय दोन गटातील लोकही होते. या ठिकाणी कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.