Fri, Sep 21, 2018 11:25होमपेज › Sangli › मिरजेतही भंगार गाड्या वर्षानुवर्षे रस्त्यांवरच

मिरजेतही भंगार गाड्या वर्षानुवर्षे रस्त्यांवरच

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 8:45PMमिरज : जालिंदर हुलवान

मिरज शहरामध्ये भंगार गाड्या अनेक रस्त्यांवर अनेक वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला व  परिसरात राहणार्‍यांनाही त्रास होतो. पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाने या गाड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज  आहे. 

मिरज एमआयडीसी रस्त्यावर अनेक भंगार गाड्या  आहेत. छत्रपती शिवाजी क्रीडांगणाकडून पुजारी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरही अशा भंगार गाड्या पडलेल्या आहेत. जवाहर चौकातून किल्ल्याकडे जाणारा रस्ता, नदीवेस रस्ता, कुंभार गल्ली, शिवाजी रस्ता, मार्केट रस्ता, गुरूवारपेठेतून मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर  भंगार गाड्या पडून आहेत.  वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी येतात. पण त्या तक्रारींचे काय होते हे त्यांनाच माहीत.  कोणत्याही वाहनाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज असते. त्यालाही ठराविक मुदत असते. ती मुदत संपली की त्या वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज असते. 
ते रजिस्ट्रेशन न करताच अनेक गाड्या रस्त्यावरून धावत असतात. त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही. या गाड्यांचे रजिस्ट्रेशन संपले की त्या गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या जातात.  अशा गाड्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. रस्त्यावर भंगार गाड्या उभ्या करणार्‍यांना महापालिकाही दंड करू शकते. त्यांनीही अशी कारवाई करण्याची गरज आहे.