Sun, Feb 23, 2020 16:41होमपेज › Sangli ›  ब्रम्हनाळ शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक घेणार : संघमित्रा गायकवाड

 ब्रम्हनाळ शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक घेणार : संघमित्रा गायकवाड

Published On: Aug 22 2019 2:08PM | Last Updated: Aug 22 2019 2:19PM


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सांगली आणि कोल्हापुरात महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. या भागातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी  ब्रम्हनाळ शाळेतील ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेण्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या महिला महाराष्ट्र उपाध्यक्षा संघमित्राताई गायकवाड यांनी नुकतीच केली आहे. 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आवाहन केले होते. त्यानुसार, संघमित्रा गायकवाड यांनी व मुंबईतील मुलुंड, भांडुप, चेंबूर, मरोळ, गोरेगाव, अंधेरी, पालघर, आदी भागातील रिपाइं कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांना मदत केली आहे

त्यानंतर सांगलीतील ५ गावांतील विद्यार्थी ब्रम्हनाळ (हायस्कूल) शाळेत शिकत आहेत. संघमित्रा यांनी वसगडेगावं, खटाव, ब्रह्मनाळ, पलूस या  गावांतील पूरग्रस्त भागाचा व गरजू महिलांना साड्या व जीवनावश्यक वस्तू साखर, तांदूळ, कोलगेट, मिनरल वाटर, साबण, गहू, मेडिसन, इत्यादी सामग्री स्वतः खरेदी करून पाहणी दौरा केला. याप्रसंगी माजी आमदार एल टी सावंत, एमगर सर, पोलिस पाटील जेन,  कुमार सावंत, अनिल सावंत, राजू सावंत आदी उपस्थित होते.