होमपेज › Sangli › जिल्हा परिषद सभेत ‘शिक्षण’वरून खडाजंगी

जिल्हा परिषद सभेत ‘शिक्षण’वरून खडाजंगी

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 9:04PMसांगली : प्रतिनिधी

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेस झालेला विलंब, हस्तक्षेप, शिक्षकांची गैरहजेरी, सहाशेवर रिक्त पदे, चार-चार महिने रजा काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे शिक्षक, साहित्य खरेदीस झालेला विलंब यावरून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली. बनावट स्ट्रेप्टोसायक्‍लीन कीटकनाशकप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाईचा ठराव शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला. ‘एलईडी’प्रकरणी एप्रिलमध्ये अहवाल प्राप्त होताच कारवाई होईल, असे सांगण्यात आले. 

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत तसेच सदस्य व अधिकारी उपस्थित होते. 

जत तालुक्यात शिक्षकांची 269 पदे रिक्त आहेत. 81 शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. सहा शाळांमध्ये एकही पूर्णवेळ शिक्षक नसल्याने सदस्यांनी आवाज उठवला. समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर व सरदार पाटील यांच्यात खडाजंगी झाली. जिल्ह्यात शिक्षक, मुख्याध्यापकांची 625 पदे रिक्त आहेत. रिक्तपदी सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड्., बी. एड्. उमेदवारांना मानधनावर नियुक्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. विनावापर ‘स्कूल ऑन व्हिल’, गायब संगणक याप्रकरणी अध्यक्ष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले. 

जितेंद्र पाटील, डी. के. पाटील सरदार पाटील, सत्यजित देशमुख, महादेव दुधाळ, शरद लाड, संभाजी कचरे, अर्जुन पाटील, प्रमोद शेंडगे, सतीश पवार, चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. शांता कणुंजे, अश्‍विनी नाईक, स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, सुरेंद्र वाळवेकर, सचिन हुलवान, नीलम सकटे, संजीव पाटील, मंदाकिनी करांडे, सुरेखा आडमुठे, भगवान वाघमारे व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील ठळक बाबी

 बनावट स्ट्रेप्टोसायक्‍लीन कीटकनाशकप्रकरणी कठोरकारवाईसाठी 

 शासनाला ठराव. विक्री केलेल्या 68 दुकानांवर कारवाई प्रस्तावित. 

 एलईडी बल्ब खरेदी : 3500 ते 5500 पेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या 

 ग्रामपंचायतींची चौकशी सुरू. दि. 10 एप्रिलपर्यंत अहवाल व कारवाई 

 मुख्याध्यापक पदोन्नती नाकारलेल्या 74 शिक्षकांना 3 वर्षे पदोन्नतीवर ‘बॅन’

 झेडपी, पं.स.चेे पदाधिकारी, सदस्यांचे भत्ते, मानधनवाढीसाठी शासनाला प्रस्ताव

 खानापूर, विटा शाळेतील अतिक्रमण दहा दिवसात काढण्याचे आदेश

 मुख्यालयी न राहणारे डॉक्टर, कर्मचार्‍यांचे घरभाडे भत्ते रोखा. मुख्यालयी 

 उपस्थितीबाबत ग्रामसेवकांचे दाखले संशयास्पद, चौकशीचे आदेश.

 वादग्रस्त वाहन चालक ठेकाप्रकरणी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी. 

 शस्त्रक्रिया आर्थिक मदत योजनेत मेंदू शस्त्रक्रिया, मणका शस्त्रक्रियेचा समावेश

 स्वीय निधीतून ट्रॅक्टर अनुदान योजना. कृषी वाचनालय पुरस्कार योजना