Thu, Jun 27, 2019 16:03होमपेज › Sangli › चारीत्र्यांच्या सशंयाने पत्नीवर हल्‍ला

सांगली : पत्नीवर कुर्‍हाडीचा हल्‍ला ;  पतीची आत्महत्या 

Published On: Jul 30 2018 4:12PM | Last Updated: Jul 30 2018 4:21PMविटा : प्रतिनिधी 

चारीत्र्यांच्या सशंयाने झोपलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्‍ला करून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार भांबर्डे (ता. खानापूर) येथे घडली. हि घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. विजय जयसिंग बाबर असे मृत पतीचे नाव असून त्याची पत्नी सुजाता हिच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जखमी सुजाताचे वडील जालिंदर शिवाप्पा कणसे यांनी विटा पोलिसात वर्दी दिली आहे.

याबाबत सुजाता विजय बाबर यांनी कराडमधील अतिदक्षता विभागातून विटा पोलिसांना दिलेली माहीती अशी,   विजय हा मोल मजुरी करत असत्याने त्यास अलीकडच्या काळात दारूचे व्यसन होते. त्याने सुजाताच्या चारित्र्यांवर संशय घेत "मला मारायला तिने मारेकरी घातलेत" अशी बडबडसुद्धा करीत होता. 

रात्री नऊच्या दरम्यान जेवण झाल्यावर सुद्धा तो सुजाताला शिव्या देत होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सुजाताने नेहमीप्रमाणे घराला आतून कुलूप लावून घेतले आणि ती झोपी गेली .त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अचानक सुजाताच्या डोक्यात कुऱ्हाडीचा हल्‍ला झाला.त्यामूळे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुजाताने आरडा -ओरडा केला. 

हा आरडा - ओरडा ऐकून बाहेरील आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी घराचा दरवाजा तोडून जखमी सुजाताला बाहेर काढले.आणि वडील जालिंदर आणि आई नीलाबाई याच्यांसमवेत पुढील उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात सुजाताला दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी सांगितले.

घरात कोणीही नसल्याने विजयने घराच्या आतील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पाटील यानी त्वरित विटा पोलिसांना खबर दिली. त्यानंतर सहाय्यक  पोलीस निरीक्षक धनाजीराव पिसाळ यांच्या सह पोलीस पथकाने घटना स्थळाचा पंचनामा केला. या पुढील तपास सहाय्यक  पोलीस निरीक्षक धनाजीराव पिसाळ करीत आहेत.