Wed, Jul 17, 2019 18:23होमपेज › Sangli › विट्यात एसटी कर्मचाऱ्यांचा आदर्शाचा धडा(व्हिडिओ) 

विट्यात एसटी कर्मचाऱ्यांचा आदर्शाचा धडा(व्हिडिओ) 

Published On: Jan 09 2018 3:44PM | Last Updated: Jan 09 2018 3:44PM

बुकमार्क करा
विटा : विजय लाळे

सामान्य माणसांची जीवन वाहिनी म्हणून लाल परी म्हणजेच एसटीकडे पाहिले जाते. ज्यावेळी दंगल किंवा आंदोलने होतात त्यावेळी हिच लाल परी सामान्य लोकांच्या रोषात अकारण पहिली बळी ठरते. परंतु, विटा एसटी आगाराच्या  कर्मचाऱ्यांनी  एका आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्‍या विद्यार्थिनीच्या एसटी पासची सोया करून चांगुलपणाचा आदर्श निर्माण केला आहे.

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना एसटीचे पासेस बंद करण्याच्या राज्य शासनाच्या एसटी महामंडळाच्या निर्णयाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. विट्यात एका गरीब आणि होतकरू विद्यार्थिनीला रोजचा ८ ते १० किलो मीटरचा प्रवास करून एसटीने येणे आर्थिक कारणामुळे  शक्य नव्हते. त्यातच या महामंडळाच्या नव्या नियमाची माहितीही अनेकांना नाही. नेहमीप्रमाणे आज संबंधित विद्यार्थिनी पास काढण्यासाठी आली असता अचानक हा नियम लागू झाल्याचे समजले आणि तिला रडूच फुटले. घरची नाजूक परिस्थिती असल्‍याने तिला  रोज तिकीट काढून कॉलेजला येणे कठीण होते. संबंधित विद्यार्थिनीची ही अवस्था तिथे उपस्थित आगाराच्या व्यवस्थापक अविनाश थोरात स्थानक प्रमुख उदय पवार, दीपक रेडेकर, विनायक माळी , संघटनांचे प्रतिनिधी अनिल कदम, सुनील जाधव , जनार्दन शेगाळे आदी मंडळींच्या लक्षात आली. त्‍यानंतर या सर्वांनी वर्गणी गोळा करून तिला तिमाही पास काढून दिला. कर्मचाऱ्यांच्या चांगुलपणामुळे आपले शिक्षण पूर्ण होणार या आनंदात संबंधीत विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानले.