Thu, Sep 20, 2018 20:23होमपेज › Sangli › ‘येता वरिष्ठांचा दौरा,  तोचि दिवाळी दसरा’ ’ (व्हिडिओ)  

‘येता वरिष्ठांचा दौरा,  तोचि दिवाळी दसरा’ (व्हिडिओ) 

Published On: Dec 01 2017 7:30PM | Last Updated: Dec 01 2017 7:30PM

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे 

 एरवी पोलिस ठाण्याच्या आवारात गेले, की  जागोजागी साठलेला कचरा, गुटखा, पान तंबाखू ने रंगलेल्या भिंती, अनावश्यक लोकांची वर्दळ असे दिसून यायचे, पण आज विटा पोलिस ठाण्याला भेट द्या, अक्षरशः एखादया कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्यासारखे वाटेल. सांगली पोलिस ठाणे एवढे चकचकीत  झाले कारण, सांगलीत घडलेले कोथळे प्रकरण, आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या पोलिस महनिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचा दौरा आहे. त्यामुळे विटा पोलिस ठाण्याची इमारत चकाचक झाली आहे.  या विषयी लोक गमतीने  ‘येता वरिष्ठांचा दौरा,  तोचि दिवाळी दसरा’  असे लोक गमतीने म्हणू लागले आहेत . 

 दिवाळी दसऱ्या सारख्या सणांना राहती घरे, गाड्या, अंगण जसे स्वच्छ केले जाते, अगदी तशीच विटा पोलिसांची लगीन घाई सध्या सुरू आहे. म्हणतात ना ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, अशीच काहीशी पोलिसांची स्थिती बनली आहे, सांगलीचे अनिकेत कोथळे प्रकरण घडले आणि पोलिस यंत्रणेत खळबळ माजली, त्यातून अनेकजण आपल्याही काही चुका घडल्या आहेत का याचा मनातल्या मनात का असेना विचार करू लागले, तसेच कोथळे प्रकरणानंतर तर अनेकजण आपले काही एखादे जुने प्रकरण तर निघणार नाही ना? या विवंचनेत होते, या सगळया पार्श्वभूमीवर पोलिसांनी तूर्तास तरी अंतर्बाह्य स्वच्छता करण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसते. 

 त्यातूनच नांगरे-पाटील साहेबांचा दौरा उद्या होत आहे, त्यासाठी पोलिस ठाणेच नाही तर आवरही धुवून काढला आहे. रंग रंगोटी केली आहे. महिलांचा विशेष कक्ष उभारला आहे.  एरवी दुर्गंधी येत असलेली स्वच्छताग्रह चकाचक झाली आहेत. एवढेच नाही तर आरोपीसाठी सुसज्ज कोठडी तयार करण्यात आली आहे. ही सगळी धांदल सुरू असतानाच विट्यात काल गुरुवारी एका रात्रीत ४ ठिकाणी घरफोडी झाल्याचे समजले आणि पोलिसांच्या दृष्टीने टेन्शन सुरू झाले. वरिष्ठ अधिकारी येत असल्याने जी तयारी केली जात आहे. तीच दक्षता कायम राहावी. सध्या केली जात असलेली स्वच्छता कारभारातही यावी अशी अपेक्षा सामान्य विटेकर व्यक्त करीत आहे.