Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Sangli › जन्मशताब्दी वर्षातच वसंत घरकुल गुंडाळले

जन्मशताब्दी वर्षातच वसंत घरकुल गुंडाळले

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:12PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री (स्व.)वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच जिल्हा परिषद स्वीय निधीतील ‘वसंत घरकुल’ ही योजना गुंडाळली आहेे. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नावाने सन 1985 च्या दरम्यान ही योजना सुरू केली होती. अपुर्‍या निधीचे कारण देत ‘समाजकल्याण’ ने ही योजनाच बंद केली  आहे. 

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विकासासाठी शासन निधीतून तसेच जिल्हा परिषद स्वीय निधीतून विविध योजना राबविल्या जातात. शासनाच्या दि. 20 ऑक्टोबर 1999 च्या निर्णयान्वये मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम खर्च करायची आहे. त्यानुसार जिल्हा परिषद स्वीय निधीच्या सन 2017-18 च्या प्रथम सुधारित अंदाजपत्रकात 1 कोटी 16 लाखांची तरतूद केलेली आहे. आर्थिक वर्षाच्या प्रथम सुधारित अंदाजपत्रकात समाजकल्याणसाठी एकूण तरतूद 1 कोटी 86 लाखांची तरतूद केलेली आहे. 

वसंत घरकुल योजनेवर सन 2016-17 या वर्षात  1 कोटी 29 लाख 81 हजार रुपये खर्च झालेले आहेत. दरम्यान यापूर्वीच्या मंजूर घरकुलांच्या अनुदान हप्त्याचा खर्च लक्षात घेता यावर्षी प्रती सदस्य एकही घरकुल मंजूर करता येणार नसल्याने ही योजनाच थांबविण्याचा निर्णय ‘समाजकल्याण’ने घेतला. सन 2017-18 मध्ये स्वीय निधीतील  योजनांमधून वसंत घरकुल योजना गुंडाळली आहे. समाजकल्याण समितीच्या काही सदस्यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.