Thu, Jun 27, 2019 02:12होमपेज › Sangli › सांगलीत दोन गंठण लंपास

सांगलीत दोन गंठण लंपास

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 09 2017 12:01AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरातील मुख्य बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधील चार तोळ्यांची दोन सोन्याची गंठण लंपास करण्यात आली. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  याबाबत मयुरी राहुल कोल्हापुरे (वय 30, रा. कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हापुरे सकाळी अकराच्या सुमारास इचलकरंजीला जाण्यासाठी सांगली बसस्थानकावर आल्या.

त्यावेळी स्थानकावर अचानक प्रवाशांची गर्दी झाली होती. त्या गर्दीतच त्या इचलकरंजीच्या बसमध्ये बसल्या. त्यावेळी त्यांनी दोन गंठण  पर्सच्या कप्प्यात ठेवली होती. जयसिंगपूरमध्ये गेल्यानंतर दोन्ही गंठण पर्समध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यानंतर त्यांनी तातडीने वाहक, चालकाना कल्पना दिली. बस जयसिंगपूर बसस्थानकातच थांबवून ठेवली.कोल्हापूरे यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.