Fri, Nov 16, 2018 02:24होमपेज › Sangli › फाळके खून प्रकरण : प्रमुख संशयित राजेश पाटील यांना अटक

फाळके खून प्रकरण : प्रमुख संशयित राजेश पाटील यांना अटक

Published On: Sep 06 2018 2:34PM | Last Updated: Sep 06 2018 2:34PMतासगाव : प्रतिनिधी

युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील याने गावातील मातंग समाजाच्या राजेश परशराम फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री खुनी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश फाळके यांचा गुरुवारी पहाटे  उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 यासंबंधी राजेश पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) च्या पथकाने कराड येथे अटक करण्‍यात आले आहे.  तसेच  युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी  केल्‍याची माहिती  युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिली आहे.