Tue, Nov 20, 2018 17:48होमपेज › Sangli ›  सिव्हिलमध्‍ये रुग्णाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न 

 सिव्हिलमध्‍ये रुग्णाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न 

Published On: Jun 22 2018 3:48PM | Last Updated: Jun 22 2018 3:47PMसांगली : प्रपिनिधी 

 येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या  इमारतीवरुन अनिल केशव माने (वय ५५, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, शंभरफुटी रस्ता, सांगली) या रुग्णाने रुग्‍णालयाच्‍या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. आजाराला कंटाळून त्यांने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनिल माने दारुचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्या लिव्हरचा आजार निर्माण झाला आहे. घरच्यांनी त्यांना १७ जून रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.  शुक्रवारी सकाळी वार्डामध्ये डॉक्टर तपासणीला आले होते. माने यांच्या मुलांसोबत डॉक्टर पोटाच्या विकाराबाबत चर्चा करीत होते. 

डॉक्टरांनी नाकावाटे पाईप टाकून उपचार करुया, असे सांगत होते. हे ऐकून माने तेथून बाहेर पडले. ते थेट रुग्णालय इमारतीच्या छतावर गेले. तेथून त्यांनी उडी घेतले. ते वार्ड क्रमांक चाळीसच्या पिछाडीस दगडावर पडले. हा प्रकार लक्षात येताच कर्मचार्‍यांनी धाव घेतली. माने यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले.