Sat, Apr 20, 2019 08:49होमपेज › Sangli › खानापूर-आटपाडी तालुक्याच्या सीमेवरील तीर्थक्षेत्र शुकाचार्य 

खानापूर-आटपाडी तालुक्याच्या सीमेवरील तीर्थक्षेत्र शुकाचार्य 

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 6:41PMआटपाडी : लतिफ मुलानी

खानापूर आटपाडी या दुष्काळी तालुक्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र शुकाचार्य हे ठिकाण आहे.  हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य व मनमोहक म्हणून सांगली जिल्ह्यात प्रसिध्द आहे. तसेच  येथे शेवटच्या श्रावण सोमवारी यात्रा भरते.

Image may contain: one or more people, tree and outdoor

 हिरवी वनराई यामुळे हा परिसर विलोभनीय 

Image may contain: mountain, sky, grass, plant, outdoor and nature

हिवतडपासून तीन किमी व भिवघाटपासून आठ किमी अंतरावर तीर्थक्षेत्र शुकाचार्य हे ठिकाण आहे. या देवस्थानचा परिसर आल्हाददायक असून याठिकाणी निसर्गाचा मुक्त आविष्कार पहावयास मिळतो. या परिसरात उंच डोंगरकडा, हिरवी वनराई यामुळे हा परिसर विलोभनीय वाटत असल्याने भविकाबरोबर पर्यटक मंडळी आकर्षित होऊ लागली आहेत.

Image may contain: mountain, sky, grass, outdoor and nature

शुकमुनी हे तपस्या करण्यासाठी या परिसरात येऊन राहिले होते. शुकमुनींची तपस्या भंग व्हावी म्हणून याठिकाणी इंद्राने अप्सरांना पाठवले. मुनींच्या तपस्येत बाधा आणण्यासाठी नृत्य, गायनाचा अलौकिक आविष्कार झाला तरीही त्यांची तपस्या भंग होऊ शकली नाही. अशी अख्‍यायिका सांगितली जाते.

कावडीच्या आकाराचा डोंगर

या मंदिरापासून  कावडीच्या आकाराचा डोंगर आहे. शुकाचार्य परिसरात गोमुखातून सदैव थंड पाणी वाहत असते. येथे ऐन दुष्काळातही पाणी उपलब्ध असते. तसेच या परिसरात निरनिराळे पक्षी पहावयास मिळतात.

Image may contain: tree, outdoor and water

पावसाचे प्रमाण अत्यल्प तरीही निसर्गाची नवलाई

या दुष्काळी टापूत दरवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. तरीही या भागात निसर्गाची नवलाई पहावयास मिळते. अतिशय नयनरम्य, मनाला सुखद अनुभव देणारा शुकाचार्य परिसर पर्यटकांना साद देत आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. तसेच शाळेच्या सहलीही येतात .

Image may contain: 1 person