Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Sangli › शतकाची परंपरा असलेली शिराळची 'नागपंचमी'

शतकाची परंपरा असलेली शिराळची 'नागपंचमी'

Published On: Aug 15 2018 1:25AM | Last Updated: Aug 14 2018 7:33PM
शिराळा : विठ्ठल नलवडे

शतकाची परंपरा असलेली  ऐतिहासिक शिराळची  नागपंचमी १५ ऑगस्टला  होत आहे. शिराळा नागपंचमी उत्सवात देश - विदेशातील पर्यटक व प्रसार माध्यमे यामुळे नागपंचमी जगभर प्रसिद्ध झाली व शिराळा गाव जगाच्या नकाशावर झळकले. 

न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार नागपंचमी साजरी

नागपंचमी उत्सव निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी यामुळे बंधनात अडकला आहे. नागपंचमीवर न्यायालयाने बंधने आणली आहेत. जिवंत नाग पूजा, नागस्पर्धा, जीवंत नागाची मिरवणूक यावर बंधने आली आहेत.  न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळाकर बंधू  नागपंचमी साजरी करत आहेत. जरवर्षी प्रतिकात्मक नागाची पूजा करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. 

नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात 

शिराळा येथे नागपंचमी उत्सव हा धार्मिकता जोपासून विज्ञान निष्ठ पद्धतीने साजरा केला जातो.  कोणतीही अंधश्रद्धा नाही. शिराळयात कधीही नाग सापडला तर त्याला मारत नाही.  वन विभागाच्या देखरेखीखाली त्यास सोडून दिले जाते. नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात आहेत. आणि आज जगात शिराळ्‍याची ओळख जिवंत नागाची पूजा करतात यासाठीच आहे. 

शिराळा नागपंचमीचा इतिहास प्राचीन 

 शिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास प्राचीन आहे. श्री गोरक्षनाथ  महाराज यांनी जीवंत  नाग  पूजेची प्रथा  शिराळ्‍यात सुरू केली. गोरक्षनाथ हे फिरत शिराळा येथे आले होते.  भिक्षा मागत फिरत असताना  महाजन यांच्या घरी आले.  त्यावेळी महाजन यांच्या घरातील भगिनी मातीच्या नागाची पूजा करत होती. त्यामुळे भिक्षा वाढण्यास वेळ झाला. त्यावेळी श्री गोरक्षनाथ यांनी सांगितले, जीवंत नागाची पूजा करा,  असे सांगितले.  तेव्‍हापासून जीवंत नागाची पूजेची परंपरा सुरू होती. मात्र आता ही परंपरा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंद झाली आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळात  १८६९ सालची शिराळा नागपंचमी विषयी पुराव्याची कागदपत्रे सापडली आहेत.१८४८ मध्ये शिराळा येथे नाग आणल्याचा पुरावा सापडला आहे.

आजही न्‍यायालयीन लढा सुरुच

 नागपंचमी यात्रा एक दिवस भरत असून राज्यातील भाविकांची मोठी गर्दी आंबामातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून सुरू असते. नागपंचमी उत्सव गत वैभव मिळावे,  जिवंत नागाची पूजेची परंपरा सुरू रहावी यासाठी शिराळकरांचा न्यायालयायीन लढा आजपर्यंत सुरू आहे. न्यायालयीन लढयासाठी सर्व नागराज मंडळे व सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. न्यायालयीन लढा सुरू आहे.