Tue, Aug 20, 2019 05:10होमपेज › Sangli › सांगली महापालिकेत राडा; आयुक्त हटावची मागणी(Video)

सांगली महापालिकेत राडा; आयुक्त हटावची मागणी(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या महासभेत आज, गोंधळ झाला. विकास कामांच्या फाईली प्रशासनाने अडवल्याच्या विरोधात नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यात नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी माईक डोक्यात मारून घेतला. तर महिला आणि पुरुष नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना हटविण्याची मागणी केली आहे. 

महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू आहे. नगरसेवकांच्या विकासकामांच्या फाइल्स अडविल्या जात असल्याचा आरोप, नगरसेवकांनी आयुक्त आणि प्रशासनावर केला आहे. गेल्या महासभेतही यामुद्दयावरून सभेत वाद झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज, सभागृहात पहायला मिळाली. 

विकासकामांच्या ४५० फाईल्स रखडल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. येत्या जून-जुलै महिन्यात सांगली महापालिकेची निवडणूक लागणार असल्याने नगरसेवकांनाही विकासकामांची घाई झाली आहे. तसेच आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जाते. आजच्या सभेला खेबुडकर उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी सुनील पवार उपस्थित होते. मात्र, गदारोळानंतर तेही सभागृहातून बाहेर पडले. 

Tags : sangli, sangli municipal corporation, sangli municipal corporation elections, development work, Ravindra Khebudkar, 


  •