Fri, Jan 18, 2019 21:10होमपेज › Sangli › सांगली मनपा निवडणुक ; मतदान उत्साहात

सांगली मनपा निवडणुक ; मतदान उत्साहात

Published On: Aug 01 2018 8:25AM | Last Updated: Aug 01 2018 8:25AMसांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड  महापालिका निवडणूक मतदानासाठी मतदान केंद्रांचे रुपडे पालटण्यात आले. मतदान प्रक्रिया आकर्षक करण्यासाठी, तसेच लोकांना त्यांच्या लोकशाहीतील हक्कांप्रती जागृत करण्यासाठी मतदान केंद्रावर विविध चित्रे, रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. 

लोकशाहीत मतदानाचा दिवस हा एका उत्सवासारखा असतो. याची प्रचिती सांगलीतील महानगरपालिकेच्या मतदान केंद्रावर गेल्यावर येतो. येथील प्रशासनाने हा लोकशाही उत्सव एखाद्या मंगल कार्यक्रमासारखा साजरा करण्यासाठी मतदान केंद्रांना रोशनाई, केंद्राबाहेर रांगोळी सनई- चौघडे यांचा वापर केला. यामुळे लोकांच्या लोकशाहीतील कर्तव्याचे(मतदान) रुपांतर एका मंगल उत्सवात झाले आहे.  

याचबरोबर संपूर्ण मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करणारी चित्रे लावण्यात आली आहेत. याद्वारे नवमतदारांना त्यांच्या कर्तव्याची हक्काची जाणिव करून देण्यात येत आहे. सांगली प्रशासनाचा हा उपक्रम लोकशाही रुजवण्यात मोलाचे योगदान देत आहे.