Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Sangli › धक्कादायक; निवडणुकीच्या प्रचारानंतर ‘भानामती'

धक्कादायक; निवडणुकीच्या प्रचारानंतर ‘भानामती'

Published On: Jul 31 2018 11:35AM | Last Updated: Jul 31 2018 11:25AMसांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी  थंडावल्या. आता बुधवारी (दि. १)  तीनही शहरांत मतदान होणार आहे. शुक्रवारी, ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.  निवडणूक रिंगणातील ४५१ उमेदवारांचे  राजकीय भवितव्य त्या दिवशी ठरणार आहे. दरम्यान, प्रचाराची सांगता झाल्यानंतर सांगलीत भानामती, लिंबू फिरवणे या सारख्या अंधश्रध्दा पसरवणाऱ्या प्रकारांना सोमवारी रात्रीपासूनच ऊत आला आहे. 

उद्या १ ऑगस्ट रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग १९ मध्ये चौकाचौकात लिंबू आणि अंडी असा उतारा टाकून करणी भानामतीचा प्रकार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सकाळी निदर्शनास आले. या प्रकाराची प्रभागातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीत असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही अशा घटना घडत असल्याने सुज्ञ नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.